Biography of scientist in marathi language

C V Raman Mahiti Marathi

सी.व्ही.रमण हे आधुनिक भारतातील एक महान वैज्ञानिक होते. विज्ञान क्षेत्रात त्यांनी आपलं महत्वपूर्ण योगदान दिलंय आणि आपल्या विविध संशोधनांमुळे विज्ञानाच्या दुनियेत आपल्या भारताला वेगळी ओळख मिळवून दिली. ‘रमण प्रभाव’ (Raman Effect) हा त्यांचा संशोधनांपैकी एक महत्वपूर्ण शोध होता, त्याकरता त्यांना 1930 साली नोबेल पुरस्काराने गौरविण्यात आलं. त्यांनी हा शोध लावला नसता तर ‘समुद्राच्या पाण्याचा रंग निळा का असतो’ हे आपल्याला कधी समजलच नसतं.

या शोधामुळे लाईट च्या नेचर आणि बिहेवियर बद्दल देखील हे कळलं की जेंव्हा लाईट पारदर्शी माध्यमातून जसं सॉलीड, लिक्विड, आणि गैस मधून प्रवास करतो तेंव्हा तिच्या गुणांमध्ये बदल होतो. त्यांनी केलेल्या नवनवीन शोधांमुळे विज्ञान क्षेत्रात भारताला एक नवी दिशा मिळाली, देशातील विकासाला चालना मिळाली.

सी.व्ही.रमण यांना भारताच्या सर्वोच्च अश्या “भारत रत्न” आणि ‘लेनिन शांती’ पुरस्कारासह विज्ञान क्षेत्रात त्यांच्या महत्वपूर्ण कार्यामुळे अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं आहे. भारताचे महान वैज्ञानिक सी.व्ही.रमण यांच्याविषयी या लेखातून अधिक जाणून घेऊया…

आधुनिक भारताचे महान वैज्ञानिक भारतरत्नसी.व्ही.रमण – CV Raman Information direction Marathi

सी.व्ही.रमण यांचा संक्षिप्त परिचय – Byword. V. Raman Biography in Marathi

पूर्ण नांव (Name)सर चंद्रशेखर वेंकट रमण ( सी.व्ही.रमण)
जन्म (Birth)7 नोव्हेंबर1988
जन्मस्थान (Birthplace)तिरुचिरापल्ली, तामिळनाडू
वडील (Father Name)चंद्रशेखर अय्यर
आई (Mother Name)पार्वती अम्मल
पत्नी (Wife Name)त्रिलोकसुंदरी
कार्य (Known for)रमण प्रभाव (Raman effect) चा शोध, वैज्ञानिक
शिक्षण (Education)एम.एस.सी
मृत्यू (CV Raman Death)21 नोव्हेंबर 1970 बैंगलोर
सन्मान (Awards)प्रकाशाचे प्रकीर्णन आणि रमण प्रभावाच्या (Raman Effect) शोधा करता नोबेल पुरस्कार,भारतरत्न, लेनिन पुरस्कार.
नागरिकता (Nationality)भारतीय

रमण इफेक्ट चा शोध – Raman Effect birth Marathi

  • सी.व्ही.रमण यांनी लावलेल्या ‘रमण इफेक्ट‘ शोधामुळे विज्ञान क्षेत्रात भारताला एक नवी ओळख मिळाली. 28 फेब्रुवारी 1928 साली अपार कष्ट आणि प्रयत्नांच्या जोरावर त्यांनी ‘रमण इफेक्ट’ चा शोध लावला.
  • दुसऱ्या दिवशी त्यांनी या शोधाची रीतसर घोषणा केली. त्यांच्या या शोधामुळे समुद्राच्या पाण्याचा रंग निळा का असतो याचा आणि कुठलाही प्रकाश जेंव्हा एखाद्या पारदर्शी माध्यमातून परावर्तीत होतो तेंव्हा त्याच्या मूळ गुणधर्मात बदल होतो याचा शोध लागला.
  • ‘नेचर’ या प्रतिष्ठित वैज्ञानिक पत्रिकेने या बातमीला प्रकाशित केले. त्यांच्या या  शोधाला ‘रमण इफेक्ट’ (Raman effect) वा ‘रमण प्रभाव’ असे नाव दिल्या गेले. यानंतर ते एक महान वैज्ञानिक म्हणून ओळखले जाऊ लागले आणि त्यांची ख्याती जगभर पसरली.
  • 1928 साली सी.व्ही.रमण यांनी बैंगलोर स्थित साउथ इंडियन सायन्स असोसिएशन येथे आपल्या या शोधावर स्पीच दिले. पुढे जगातील अनेक प्रयोग शाळांमध्ये त्यांच्या या शोधावर संशोधन होऊ लागलं.
  • सी.व्ही.रमण यांच्या या शोधामुळे आता लेजर संशोधनामुळे रसायन उद्योग आणि प्रदूषणाच्या समस्येत रसायनाची मात्रा कळण्यात मदत होते. विज्ञान क्षेत्रात सी.व्ही.रमण यांचा हा शोध म्हणजे अतुलनीय संशोधन होते.
  • त्यांच्या या शोधामुळे 1930 साली त्यांना प्रतिष्ठित अश्या ‘नोबेल पुरस्काराने’ गौरविण्यात आलं. सी.व्ही.रमण यांच्या या अद्वितीय शोधामुळे भारत सरकारने 28 फेब्रुवारी हा दिवस ‘राष्ट्रीय विज्ञान दिवस’ म्हणून साजरा करण्याची घोषणा केली.

रमण रिसर्च इंस्टीट्युट ची स्थापना – Raman Research Institute

1948 साली सी.व्ही.रमण यांनी विज्ञानाच्या विचाराला आणि संशोधनाला प्रोत्साहन देण्यासाठी रमण रिसर्च इंस्टीट्युट बैंगलोर (Raman Check Institute, Bangluru) ची स्थापना केली होती.

महान वैज्ञानिक सी.व्ही.रमण यांना मिळालेले सन्मान आणि पुरस्कार – C. V. Raman Awards

  • सी.व्ही.रमण यांना 1924 साली लंडन च्या ‘रॉयल सोसायटी’ चे सदस्य बनविण्यात आले.
  • 28 फेब्रुवारी 1928 साली सी.व्ही.रमण यांनी ‘रमण इफेक्ट‘ चा शोध लावला होता. म्हणून या दिवसाला भारत सरकारने दरवर्षी ‘राष्ट्रीय विज्ञान दिवस’ म्हणून साजरा करण्याची घोषणा केली होती.
  • सी.व्ही.रमण यांनी 1929 साली भारतीय विज्ञान काँग्रेसच्या 16व्या सत्राचे अध्यक्षपद भूषवले होते.
  • सी.व्ही.रमण यांना, 1929 साली त्यांच्या वेगवेगळ्या प्रयोगांमुळे आणि शोधांमुळे अनेक विद्यापीठांच्या मानद उपाधीने, आणि पदकांनी सन्मानित करण्यात आलं.
  • 1930 साली प्रकाशाचे परावर्तन आणि ‘रमण इफेक्ट’ सारख्या महत्वपूर्ण शोधा करता सी.व्ही.रमण यांना प्रतिष्ठेच्या अश्या नोबेल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार प्राप्त करणारे ते पहिले आशियाई होते.
  • विज्ञान क्षेत्रातील त्यांच्या महत्वपूर्ण योगदाना करता त्यांना 1954 साली भारताच्या सर्वोच्च अश्या ‘भारतरत्न’ देऊन गौरव करण्यात आला.
  • 1957 ला सी.व्ही.रमण यांना ‘लेनिन शांतता पुरस्कार’ प्रदान करण्यात आला.

सी.व्ही.रमण यांचे निधन – Adage. V. Raman Death 

सी.व्ही.रमण यांचा आयुष्यातील बराचसा वेळ प्रयोगशाळेत नव-नवी संशोधनं करण्यात व्यतीत झाला. वयाच्या 82 व्या वर्षी रमण रिसर्च इंस्टीट्युट, बैंगलोर इथं आपल्या प्रयोगशाळेत काम करत असतांना त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि ते खाली कोसळले, 21 नोव्हेंबर 1970 ला त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

भारताला विज्ञानाच्या क्षेत्रात आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख मिळवून देणारे महान वैज्ञानिक सी.व्ही.रमण आज आपल्यात नसले तरी देखील त्यांच्या महत्वपूर्ण शोधांमुळे ते कायम आपल्यात जिवंत राहतील. आज देखील त्यांच्या अद्वितीय शोधांचा उपयोग मोठ्या प्रमाणात केला जातो. सी.व्ही.रमण यांचे व्यक्तिमत्व येणाऱ्या कित्येक पिढ्यांना प्रेरणा देत राहील.

तर हि होती संपूर्ण माहिती सी.व्ही.रमण यांची आशा करतो हा लेख आपल्याला आवडला असेल आवडल्यास या लेखाला आपल्या मित्रांना शेयर करायला विसरू नका. धन्यवाद!